जम्मू-काश्मीरध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. तसेच ज्या ठिकाणी चकमकी झाल्या तिथून जवानांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

पुलवामा जिल्ह्यातील टिकून या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. आज पहाटे शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. टिकून परिसरात अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version