काश्मीर दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद, 3 जखमी

काश्मीर दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद, 3 जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

काश्मीरमध्ये पोलीस इमारतींवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफचे 2 जवान आणि एक पोलीस शहीद झाले आहेत. 

3 लष्करी जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पोलीस इमारतींवर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

 

दहशतवाद्यांनी यावेळी चक्क पोलिसांच्या क्वॉर्टरला लक्ष्य केल्यानं हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात 4

दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यापैकी एकाला कंठस्थान घालण्यात लष्करी सैन्याला यश आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version