लष्करी अधिकाऱ्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं खळबळ

लष्करी अधिकाऱ्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं खळबळ

वृत्तसंस्था, जम्मू- काश्मीर

 

जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात एका लष्करी अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. उमर फय्याज असं या अधिकाऱ्याचं नाव असून छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला.

 

उमर हे नुकतेच लष्करामध्ये भरती झाले होते. मंगळवारी रात्री ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुलगामला गेले होते. याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण करुन नंतर त्यांना गोळ्या घालून हरमन इथे त्यांचा मृतदेह फेकून दिला असावा असा अंदाज आहे.

 

उमर यांना इतक्या निर्घृणपणे का मारण्यात आलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version