जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा, बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा, बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

जलयुक्त शिवार अभियानातून सोलापूर तालुक्यात सुरू असलेले बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट होत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

 

स्वतःच्या खिशाला झळ सोसून जलयुक्तच्या कामाला ग्रामस्थांनी देणगी दिली. मात्र,कारी गावातील लोकांनी याच देणगीतून नदीच्या, ओढ्याच्या सरळीकरणाचे काम केले.

 

मात्र, ठेकेदरांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट काम केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. सर्व 12 बंधाऱ्यावर अशाच प्रकारच काम चालू आहे.
अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देऊनही त्यांच्याकडून या तक्रारीकडे दुर्लक्षित केल जाते. संबंधित विभागाने जर कारवाई केली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version