जलिकट्टूचे थैमान; तरुणाने गमावला आपला जीव

जलिकट्टूचे थैमान; तरुणाने गमावला आपला जीव

वृत्तसंस्था, तामिळनाडू

वळूंवर नियंत्रण मिळविण्याच्या जलिकट्टू या दक्षिणेतील प्रसिद्ध खेळादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य 11 जण जखमी झाले आहेत. तमिळनाडूचे महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार यांनी या खेळाचे उद्-घाटन केलं. या वळूंवर नियंत्रण मिळविणाऱ्यांवर सोन्याच्या नाण्यांसह इतर आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली.

मे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलांच्या शर्यतीवर बंदी घालण्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने जलिकट्टूवरही बंदी घातली होती. मात्र, तमिळनाडू सरकारने कायद्यात बदल करत हा खेळ सुरूच ठेवला आहे. सोमवारी तमिळनाडूतील विविध भागांमध्ये तीन वर्षांच्या बंदीनंतर प्रथमच जलिकट्टूचे आयोजन करण्यात आले होते. साधारण जानेवारीचा तिसरा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये या खेळाचे आयोजन केले जाते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version