जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव
जळगाव जिल्ह्यात जोरदार वादळ आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान झालं.
वादळामुळे शहरातील काही घरांचे पत्रे उडून नुकसान झालं. तर शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजतारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच तालुक्यात काही गावांमध्ये शेतीचे मोठया प्रमाणात वादळी पावसाने नुकसान झालं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.