त्याने चक्क दोन लाख रुपये खर्चून आणली धुरळणीची मशीन

त्याने चक्क दोन लाख रुपये खर्चून आणली धुरळणीची मशीन

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगाव शहरात डेंग्यू, चिकुन गुनिया आणि स्वाईन फ्लू ची साथ पसरली आहे. जागो जागी रोगराई पसरवणारे कचऱ्याचे ढिग आहेत. पण, मनपा प्रशासनाचं मात्र, त्याकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे गावातील कैलास सोनावणे या नागरिकानेच यासंदर्भात पुढाकार घेतलाय. आपल्या शंभरहून अधिक मित्रांना एकत्र आणत त्यांनी स्वच्छता उपक्रम सुरु केलाय.

स्वतःचे दोन लाख रुपये खर्चून त्यांनी धुरळणीची मशिन आणून त्यासाठी आठ ते दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलीये.  2 ऑक्टबोरपासून कैलास याच्याकडून हे काम सुरुये. आता दररोज येणारा खर्चही लोकसहभागातून उचलला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version