जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रस्त्यांमध्ये झोल, खड्डे खोल, खड्ड्यांचा आकार गोल. या ओळी असलेल्या आर जे मलिष्काच्या व्हिडिओला सर्वांनी उचलून धरले. त्यामुळे प्रशासनाच्या पोटातही दुखले.
खड्ड्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, खड्डे काही बुजले नाहीत. या खड्ड्यांपायी आपण एक हिरा गमावला. ती म्हणजे बाईकर जागृती होगाळे.
मूळची मुंबईची असलेल्या जागृतीचा पालघरमध्ये रायडिंग करताना मृत्यू झाला. देशभरात खडतर वाटा पार करणाऱ्या या महिला बुलेट रायडरला महाराष्ट्रात मात्र एका
खड्ड्यानं चकवा दिला.
गृहिणी असली तरी जागृती स्त्रियांना नवं बळ देणारी एक महिला. मुंबईमध्ये बाईकरनी नावाच्या ग्रुपची ती मेंबर होती. ज्या महिलांना बाईक रायडिंगची आवड आहे, अशा
महिलांची मोट बांधून तिने मोठमोठ्या मोहिमा आखल्या होत्या.
मात्र, एका खड्ड्यामुळे या जगातून ती कायमची निघून गेली. त्यामुळे एका खड्ड्यामुळे झालेलं नुकसान, प्रशासन काय जाणणार असंच म्हणायची आता वेळ आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.