जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबईतील जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. संपात सामील झालेले निवासी डॉक्टर रविवार (दि.४ जून) पासून कामावर रुजू होणार आहेत. जे.जे.रुग्णालयातील ज्येष्ठ डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा शनिवारी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला. त्यानंतर रविवारी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीसाठी आंदोलन करत संप पुकारला होता. जे.जे रुग्णालयातील काही प्राध्यापक आणि डॉक्टर विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला होता.याबरोबरच डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीची मागणी या निवासी डॉक्टरांनी केली होती. निवासी डॉक्टरांनी केलेल्या या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते.

त्यानंतर शनिवारी राज्य सरकारकडून डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेस निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांवर डॉ.तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर निवासी डॉक्टरांनी गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर डॉ.तात्याराव लहाने यांनी तडकाफडकी राजीनामा देत आपली भूमिका मांडली. मात्र, राज्य सराकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यानंतर आता निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version