राज्यात घर घेणं महागणार

राज्यात घर घेणं महागणार

आजपासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२३ सुरू झाले आहे. अर्थसंकल्पातील बदल आजपासून लागू झाले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यात घर घेणं आता महागणार आहे. राज्यात एक एप्रिलपासून रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्य दर) दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार असून घर घेणं महाग होणार आहे.

राज्यात एक एप्रिलपासून दोन वर्षानंतर रेडिरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रात ८.१ टक्के वाढ, ग्रामीण भागात ६.९६ टक्के आणि नगरपालिका क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता घर घेणेही महागणार आहे.

राज्यात दरवर्षी सरकारकडून १ एप्रिलपासून नवीन रेडिरेकनरचा दर जाहीर केले जातात. आता कोरोनाकाळातील दोन वर्षानंतर रेडिरेकनरचा दर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक १३.१२ टक्के वाढ मालेगाव पालिका क्षेत्रात झाली आहे. तर, सर्वात कमी वाढ हिंगोली जिल्ह्यात झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

अर्थसंकल्पातील बदल आजपासून लागू झाले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तू महागणार आहेत. टीव्ही, एसी, मोबाईल यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version