इस्रो अंतराळात जोडणार अंतराळयाने

इस्रो अंतराळात जोडणार अंतराळयाने

वृत्तसंस्था, कोटा

 

इस्रो आता नव्या यशशिखराकडे जाण्यास सिद्ध होत आहे. नव्याने वेगात वाढू लागलेल्या अंतराळ मोहीम क्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना इस्रोने आखली आहे.

 

या आठवड्यात दक्षिण आशियातील सार्क देशांत विविध सेवा देणारा उपग्रह पाठवणार असल्याबद्दल मिळणारी शाबासकी ताजी असतानाच अंतराळात मानवांच्या वावराला वेग देणारी योजना त्याने जाहीर केली आहे.

 

या योजनेनुसार इस्रो अंतराळात दोन वेगवेगळ्या अंतराळयानांना जोडणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. या जोडणी तंत्रज्ञानामुळे दोन अंतराळयाने वेगात प्रवास करत असतानाही एकमेकांशी जोडली जाऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्यात सामानापासून माणसांपर्यंतची देवाणघेवाण शक्य होणार असल्याचा इस्रोचा दावा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version