‘इस्रो’कडून आज‘जीएसएलव्ही मार्क 3’ या भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे प्रक्षेपण

‘इस्रो’कडून आज‘जीएसएलव्ही मार्क 3’ या भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे प्रक्षेपण

वृत्तसंस्था, कोटा

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आज‘जीएसएलव्ही मार्क 3’ या पूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार असून, या प्रक्षेपकाद्वारे भविष्यकाळात भारतीय अंतराळवीर भारतीय भूमीतून अवकाशात धाडणेही शक्य होणार आहे.

‘भारताला 2.3 टनापेक्षा अधिक वजनाचे संपर्कयंत्रणा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आतापर्यंत परदेशी जावे लागत होते. आता आपल्याला चार टन वजनाचा उपग्रहही अवकाशात पाठवणे शक्य होईल. त्यामुळे या क्षेत्रात आपल्याला स्वयंपूर्णता तर मिळेलच; पण जोडीने आपण परदेशी ग्राहकही आकर्षित करू शकू,’ असे ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version