तेल अविव : इस्रायलने हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेविरोधात कारवाई सुरू केली आहे. लेबेनॉनमध्ये सत्तेत असलेल्या हिझबुल्लाला लक्ष्य करुन इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले आहेत. याआधी पेजर बॉम्ब आणि वॉकीटॉकी बॉम्ब यामुळे अनेक हिजबुल्ला अतिरेकी ठार झाले. यातून सावरण्याआधीच इस्रायलने लेबेनॉनमध्ये हिझबुल्लाच्या प्रभाव क्षेत्रावर हवाई हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिझबुल्लाचे अनेक अतिरेकी आणि स्वयंघोषीत नेते ठार झाले आहेत. हिझबुल्लाचा क्षेपणास्त्र आणि रॉकेट विभाग प्रमुख इब्राहिम मुहम्मद काबिसी ठार झाला आहे. इस्रायल हिझबुल्लाचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीचे नेतृत्व संपवण्याच्या प्रयत्नात आहे. लेबेनॉनने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ५६४ जणांचा मृत्यू झाला असून १६०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. कोट्यवधींची वित्तहानी झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.