समुपदेश करूनही तरुणी इसिसच्या वाटेवर

समुपदेश करूनही तरुणी इसिसच्या वाटेवर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

इसिस या दहशतवादी संघटनेकडून नेहमीच सोशल मीडियाद्वारे तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. पुण्यातील एक तरुणीही अशाच प्रकारे सोशल मीडियातून इसिसच्या संपर्कात असून ती सध्या काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास आहे आणि घातपात करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे.

मौलवींच्या मदतीने तिचं समुपदेशन करण्यात आले. मात्र, पुन्हा ती इसिसच्या संपर्कात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी या मुलीच्या आईशी विचारपूस केली असता ही मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असून ती कुठल्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं. मात्र, ती कुठे आहे याविषयी अधिक माहिती देण्यास तिच्या आईने नकार दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version