ISI च्या एजंटला नागपूरमधून अटक!

ISI च्या एजंटला नागपूरमधून अटक!

भारतीय क्षेपणास्त्र ब्राह्मोस मिसाईल संबंधित माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला देत असल्याच्या संशयावरून एका आयएसआय एजंटला नागपुरात अटक करण्यात आली. निशांत अग्रवाल असं या हेराचं नाव सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराच्या कारवाईद्वारे निशांतला पकडण्यात यश आलं.

निशांत अग्रवाल हा ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रोजेक्टमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला पुरवत असल्याचा निशांतवर आरोप आहे.

कोण आहे हा निशांत?

निशांत उत्तराखंडातील रुरकीचा रहिवासी असून तो गेली चार वर्षं नागपूर युनिटमध्ये काम करत होता.

निशांत मॅकेनिकल इंजिनिअर आहे.

डीआरडीओच्या क्षेपणास्त्र युनिटमध्ये शास्त्रज्ञ पदावर काम करत आहे.

नागपूरमधील उज्ज्वल नगर नरिसरात मनोहर काळे यांच्या घरात निशांत राहातोय.

निशांत मार्च 2018 मध्येच विवाह झाला.

डोंगरगावच्या प्लांटमध्ये निशांत काम करतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version