Iran Israel US War: इस्रायल रक्ताळले! ‘या’ दोन महत्वाच्या शहरांना इराणने केले लक्ष्य; हल्ल्यात लहान मुलांसह निष्पाप नागरिकांचा करुण अंत

नागरी वस्त्यांवर लक्ष्य केल्याचा आरोप करत इस्रायलने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran Israel US War: इस्रायल रक्ताळले! ‘या’ दोन महत्वाच्या शहरांना इराणने केले लक्ष्य; हल्ल्यात लहान मुलांसह निष्पाप नागरिकांचा करुण अंत

इस्रायल: मध्यपूर्वेत तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून इराणने इस्रायलमधील अराद आणि डिमोना या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये मुलांसह 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याचे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. नागरी वस्त्यांवर जाणीवपूर्वक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्याचा आरोप करत इस्रायलने या घटनेला युद्ध आणि दहशतवादाची कृती असे संबोधले आहे.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अराद शहराचे महापौर यायर मायान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी नागरिकांबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त करत सर्व इस्रायली नागरिकांच्या वतीने त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित सरकारी मंत्रालयांनी एकत्रितपणे आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

अराद शहरातील प्रभावित भागातून सुमारे 150 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने बचाव आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून काही भागात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: American Visa : अमेरिकेचा 50 देशांना दणका! व्हिसासाठी आता भरावा लागेल 15,000 डॉलर्सचा बाँड; भारत-पाकिस्तान या यादीत आहेत का?

पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना ही संध्याकाळ अत्यंत कठीण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आपत्कालीन आणि बचाव पथके घटनास्थळी कार्यरत असून त्यांना आणखी बळकटी दिली जात आहे. नागरिकांनी गृह खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या हल्ल्याचा इस्रायलमधील अनेक नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अराद आणि डिमोना येथील नागरिकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. तर माजी पंतप्रधान यायर लैपिड यांनीही या घटनेला मोठी आपत्ती असे संबोधत बचावकार्य करणाऱ्या सुरक्षा दलांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, याच दिवशी इराणकडून डिमोना परिसरावर लक्ष्य करून एक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. डिमोना हे इस्रायलच्या महत्त्वाच्या अणुस्थळाशी संबंधित केंद्र मानले जाते. त्यामुळे या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीवर जगभरातील देशांचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींकडे आंतरराष्ट्रीय समुदाय बारकाईने पाहत आहे.  

हेही वाचा: BSNL Vi Merger: टेलिकॉम सेक्टरमध्ये ‘महाविलीनीकरण’! BSNL आणि Vi एकत्र येणार? जिओ-एअरटेलचे टेन्शन वाढणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version