…अन् तोंडातच आयफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला

…अन् तोंडातच आयफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला

वृत्तसंस्था,  नवी दिल्ली

 

आयफोनची बॅटरी खरी आहे की नकली हे दातानं तपासणं एका व्यक्तीला चांगलच महागात पडलंय. कारण अशा प्रकारे आयफोनची बॅटरी तपासताना त्या बॅटरीचा स्फोट झालाय.

आयफोनची लीथियम बॅटरी मोबाईल युजर्सला सहज काढता येत नाही. मोबाईल दुरूस्त करणाऱ्या टेक्निशन्सना मोबाईलची बॅटरी काढता येते. असं असताना या व्यक्तीनं बॅटरी आपल्या दाताखाली चावली अन् मोठा स्फोट झाला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीनं आयफोनची बॅटरी तोंडात घालून काढली अन् लगेच स्फोट झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version