वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अॅपल आयफोन 7 घेण्याचा विचार करत असाल कर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पेटीएम अॅपल आयफोनवर भरघोस डिस्काउंट देत आहेत.
अॅपलच्या आयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन 6 S, आणि आयफोन 6 वर पेटीएम मोठे डिस्काउंट देत आहे.
पेटीएम अॅपल आयफोन 8 च्या 128 जीबी फोनवर 11000 रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. या फोनची आताची किंमत 58,393 रुपये एवढी
आहे जो डिस्काउंट नंतर 47,393 रुपयांत उपलब्ध होणार आहे. याशिवाय, आयफोन 7 च्या 32 जीबी फोनवर 9100 रुपयांचा कॅशबॅक
मिळणार असून कॅशबॅकनंतर याची किंमत 39,099 एवढी असणार आहे.
आयफोन 7 प्लसच्या 128 जीबी फोनवर 11500 रुपयांचा कॅशबॅक असून हा फोन पेटीएमवर 56169 रुपयांना मिळणार आहे, तर आयफोन
7 प्लस 32 जीबी फोनवर 11000 रुपयांच्या मिळणाऱ्या कॅशबॅकमुळे या फोनची किंमत 51,799 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.