वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कुलभुषण जाधवप्रकरणी पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभुषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.
अंतिम निर्णय येईपर्यंत कोर्टानं जाधवांच्या फाशीला स्थगिती दिली. पण यादरम्यान कुलभूषण जाधव यांच्या जीवाची जबाबदारी पाकिस्तानवर सोपवली.
फाशी होऊ न देणं आणि जाधवांच्या जीवाची जबाबदारी पाकिस्तानला घ्यावी लागली. आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानचे अनेक दावे फेटाळून लावले.
व्हिएन्ना करार दोन्ही देशांना बंधनकारक आहे. व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना कायदेशीर तसंच राजनैतिक मदत पुरवली पाहिजे.
कुलभूषण जाधवांना गुप्तहेर ठरवणं योग्य नाही असं मतही कोर्टानं नोंदवलंय. त्यामुळे पाकचा बुरखा मात्र फाटला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.