‘कलवरी’ पाणबुडीचा नौदलात समावेश

‘कलवरी’ पाणबुडीचा नौदलात समावेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’  पाणबुडी गुरुवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे.

यासाठी पंतप्रधान मुंबईत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत ‘कलवरी’ नौदल ताफ्यातील समावेशाचा सोहळा पार पडणार आहे.

तब्बल 120 दिवसांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर, कलवरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झाली आहे, कलवरी पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

२०२१ पर्यंत स्कॉर्पियन श्रेणीतील उर्वरित पाणबुड्या नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version