बुलडाण्यात स्क्रब टायफसचा शिरकाव

बुलडाण्यात स्क्रब टायफसचा शिरकाव

बुलडाणा जिल्ह्यात एकाच वेळी ९ जणांना स्क्रब टायफसची लागण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात ६, शेगाव तालुक्यात २, आणि जळगाव तालुक्यात एका रुग्णाला या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आफ्रिका येथील जंगलातील चिगरमाईट या कीटकाच्या चाव्यामुळे हा रोग होतो. त्यामुळे चिगरमाईट या कीटकांचा बुलढाणा जिल्ह्यात शिरकाव झाला की काय, अशी भीती सर्वांना वाटते आहे. या रूग्णापैकी ५ रुग्णांवर खामगाव शहरात उपचार सुरू आहे. तर गंभीर लक्षणे असलेल्या एका रुग्णाला अकोल्यात उपचार सुरू आहेत.

काय आहे स्क्रब टायफस ?

स्क्रब टायफस हा ‘ऑरियंटा सुटसुगामुशी’ या जीवाणूपासून होणारा आजार

ट्रॉम्बिक्युलिड माइट्सचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात

ते चावल्यामुळे हा आजार होतो.

या आजाराचे कीटक गवत, शेत, जंगल, लॉन, तलाव, झरे अशा भागांत आढळतात.

हे कीटक लाल, शेंदरी पिवळ्या रंगाचे असतात.

पूर्ण वाढ झालेले कीटक चावा घेत नाहीत.

लारव्हा स्वरूपात असलेले कीटकच चावा घेतात.

शेतात काम करणारे व जंगलात काम करणारे मजूर, गावाच्या टोकाला राहणारे लोक

अर्ध्या बाह्याचे किंवा तोकडे कपडे घालणारे व्यक्ती, हातमोजे न घालता कामे करणारे मजूर

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते.

काय आहे यावर उपाय ?

संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे.

घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झाडे झुडपे नष्ट करावी.

घरातील उंदीर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे.

घरातील साफसफाईवर विशेष लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवावे.

आजाराची लक्षणे

तीव्र ताप येणे, डोकेदुखी, संधे दुखी, थंडी वाजणे, मळमळ होणे, सुस्ती चढणे, शरीरात कंपण सुटणे, कोरडा खोकला, न्यूमोनियासदृश आजार, अंगावर चट्टे येणे, खाज सुटणे, जखम होऊन खिपल पकडणे आदी लक्षणे या आजाराची आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version