पावसाळा सुरु झाल्यामुळे आरोग्याची अधिक काळजी घेणे बांधकारक झाले आहे. कारण, पावसाळ्यात अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप यांसारख्या आजारांसोबत अनेक संसर्गजन्य आजार हे वेगाने पसरतात. त्याचबरोबर पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.
सुती किंवा इतर आरामदायक कापडाचे कपडे वापरावे. यामुळे त्वचेला श्वास घेण्यास मोकळी जागा मिळेल. सैल कपडे घातल्यामुळे हवा शरीरात जाईल आणि शरीर ओलसर राहणार नाही.
बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी अत्यावश्यक आहे. तुमचे हात आणि पाय नियमितपणे बुरशीविरोधी साबणाने धुवावे. विशेषतः आपण पावसात भिजल्यानंतर पायांमध्ये चिखल किंवा घाणेरडं पाणी यामुळे तुम्ही अनेक रोगजन्य विषाणू येतात, यामुळे बाहेरून आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवावे.
ओले कपडे अधिक काळ अंगावर ठेवू नये. जास्त वेळ त्वचा ओली राहिल्यास बुरशीजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो. पावसात भिजल्यानंतर स्वतःला पूर्णपणे कोरडं करा, शक्य असल्यास कपडे बदला किंवा इतर पद्धतीने कपडे सुकवण्याचा प्रयत्न करावा.
पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.