INDvsWI विराट कोहलीचा धमाकेदार विक्रम!

INDvsWI विराट कोहलीचा धमाकेदार विक्रम!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लागोपाठ तीन वनडे सामन्यांत शतकी खेळी करून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी शतकांची हॅट्‌ट्रिक साधणारा विराट हा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटचं वनडे कारकीर्दीतील हे ३८वं शतक ठरलं.

दरम्यान, विराटच्या शतकांनतरही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. विंडीजने भारताला २४० धावांवर रोखत ४३ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर विंडीजने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसरा वनडे सामना ‘टाय’ झाला होता. पुणे वनडेत विराटने ११० चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह आपले शतक साजरे केले. जेसन होल्डरच्या षटकात एकेरी धाव घेत विराटने शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक १०७ धावांवर विराट बाद झाला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील विराटचं हे सलग तिसरं शतक ठरलं. गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडेत विराटने १४० धावांची खेळी केली होती तर विशाखापट्टणम वनडेत विराटने नाबाद १५७ धावा केल्या होत्या. दरम्यान, वनडेत लागोपाठ चार शतके झळकावण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर असून मालिकेतील चौथ्या वनडेत चौथे शतक ठोकून या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी विराटला आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version