इंदू सरकार चित्रपटाविरोधात राज्यभरात काँग्रेस आक्रमक; पोस्टर जाळत कल्याण, ठाणे, जळगावमध्ये बंद पाडला शो

इंदू सरकार चित्रपटाविरोधात राज्यभरात काँग्रेस आक्रमक; पोस्टर जाळत कल्याण, ठाणे, जळगावमध्ये बंद पाडला शो

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मधुर भांडारकर दिग्दर्शित  इंदू सरकार चित्रपटाविरोधात राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. कल्याण, ठाणे, नाशिकसह जळगावमध्ये आंदोलने करत आणि पोस्टर

जाळत इंदु सरकारचा शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाडला.

 

मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाचा कल्याणातील शो काँग्रेसने बंद पाडला. भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला असल्याचं कार्यकर्त्यांनी

म्हटले.

 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम हा चित्रपट करीत असल्याचे सांगत कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या

प्रकाराची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.

 

सुप्रिम कोर्टाने इंदू सरकारला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर आज इंदू सरकार प्रदर्शित झाला.

 

पण, राज्यात इंदू सरकार चित्रपटाचा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. जळगावात इंदू सरकार चित्रपटाचा निषेध करण्यात आला. चित्रपटगृहा बाहेरील

पोस्टर फाडून जाळण्यात आली.

 

इंदू सरकार सिनेमा विरोधात नाशकात शहर काँग्रेसने निदर्शने केली. या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या आक्षेपार्ह विधाने असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दावा केला.

नाशिकमध्ये इंदू सरकारच्या पोस्टरला लाथा मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

 

दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version