Indurikar Daughter Engagement: लेकीच्या शाही साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत; जावयाने व्हिडिओमध्ये केला मोठा खुलासा

साधेपणा, संयम आणि दिखाऊपणाविरुद्ध नेहमी भाष्य करणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमातील या शाही थाटामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.<br/>
Indurikar Daughter Engagement: लेकीच्या शाही साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत; जावयाने व्हिडिओमध्ये केला मोठा खुलासा

Indurikar Daughter Engagement: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यामागचे कारण त्यांच्या कीर्तनातील व्याख्याने किंवा एखादा समाजप्रबोधनाचा मुद्दा नसून त्यांच्या मुलीचा धुमधडाक्यात झालेला साखरपुडा आहे. साधेपणा, संयम आणि दिखाऊपणाविरुद्ध नेहमी भाष्य करणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमातील या शाही थाटामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.

संगमनेरमधील ‘वसंत लॉन्स’ येथे इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा अत्यंत भव्य पद्धतीने पार पडला. मोठ्या गाड्यांचा ताफा, आकर्षक सजावट, शाही एंट्री आणि लेकीचा ग्लॅमरस अंदाज, हे सर्व पाहताच नेटिझन्सना धक्का बसला. किर्तनात लग्नसमारंभातील अति खर्च, मुलींच्या नाचगाण्यावरची टीका आणि साधेपणाची शिकवण देणारे महाराज, स्वतःच्याच लेकीसाठी मात्र विरुद्ध मार्गाने गेले, असे म्हणत अनेकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.

हेही वाचा – Rajkummar Rao and Patralekhaa : लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला मिळालं मोठं गिफ्ट; राजकुमार राव – पत्रलेखाच्या घरी लक्ष्मी आली!

यात भर म्हणून, कार्यक्रमातील काही व्हिडीओमध्ये ज्ञानेश्वरी मंचावर नृत्य करताना व भव्य अंदाजात प्रवेश करताना दिसते. यामुळे तर सोशल मीडियावर “उपदेश एका बाजूला आणि आचरण दुसऱ्या बाजूला” असे वक्तव्य जोरात व्हायरल झाले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित लोकसंख्येबाबत इंदुरीकर महाराजांच्या जावई साहिल चिलप यांनी स्वतःच माहिती दिली. 

एका व्हायरल व्हिडीओमध्ये साहिल यांनी सांगितलं की, “आमचा साखरपुडा अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला. जवळपास तीन ते साडेतीन हजार पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली होती.” या विधानामुळे तर नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराजांना आणखी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कारण महाराज आपल्या कीर्तनांत लग्नात अनावश्यक खर्च, मोठी गर्दी आणि दिखाऊपणा कसा चुकीचा आहे, यावर नेहमी भाष्य करतात.

हेही वाचा – Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज किर्तन करणं सोडणार? सोशल मीडियावरील टीकेनंतर घेतला मोठा निर्णय

कीर्तन सेवा थांबवण्याचा निर्णय 

या सर्व वादानंतर इंदुरीकर महाराज यांनी मनातील नाराजी व्यक्त करत, सतत होणाऱ्या टीकेने त्रस्त होऊन कीर्तन सेवा थांबवण्याचाही विचार मनात आल्याचे सांगितले. “माझ्यावर टीका झाली तरी चालेल, पण कुटुंबावर होत असेल तर हा अन्याय सहन नाही होणार,” असंही त्यांनी म्हटलं. एकूणच, इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा हा शाही साखरपुडा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, त्यांच्या उपदेश आणि आचरणातील तफावत दाखवत विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version