‘भारतीयांनी कीव शहर सोडावे’; युक्रेन सरकारचा सल्ला

‘भारतीयांनी कीव शहर सोडावे’; युक्रेन सरकारचा सल्ला

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, रशिया आणि युक्रेनमधील यद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी रशिया कीव शहरावर निशाणा साधत आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांनी कीव शहर सोडण्याचा सल्ला युक्रेन सरकारने दिला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेन सरकारकडून कडक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कीव शहर सोडावे, असे नमूद करण्यात आले आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्यावतीने असे सांगण्यात आले आहे की, लोकांनी आजच रेल्वे किंवा वाहतुकीची कोणतीही साधने पकडून कीव शहर सोडावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version