रशिया-युक्रेन यांच्यामधील युद्धाचा तिढा कायम आहे. रशिया-युक्रेनपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नाही. यादरम्यान, युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ विद्यार्थ्यांकडून ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. स्थानिक नागरिकांना प्रवेश देत पोलंडच्या सीमारेषेवर अडवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना लाथा, बुक्क्यांनी मारहाणही करण्यात आली. जे भारतीय विद्यार्थी स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना स्थानिक पोलिसांकडून लाठीमार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्यामुळे हे विद्यार्थ्यांना पालकांच्या मनाला अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर मार्ग काढत विद्यार्थ्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.