भारतातील महिला व्यंगचित्रकार

भारतातील महिला व्यंगचित्रकार

मुंबई,६ मे २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवारांचे व्यंगचित्र काढलं आहे. हे पाहून सध्या जोरदार चर्चा सुरु झाल्यात. तर या मागचं खास कारण म्हणजे आजचा दिवस अर्थात ५ मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

इ. स १८९५ मध्ये ‘द यलो कीड’ हे पहि‍ले रंगीत व्यंगचि‍त्र प्रकाशि‍त झाले होते, त्याची आठवण आणि‍ व्यंगचि‍त्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागति‍क व्यंगचि‍त्रकार दि‍न म्हणून साजरा करण्यात येतो. व्यचित्राचा प्रभाव भारतीय समाजावर देखील पडला. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनी देखील आपली कसब दाखवली आहे. यातील एक म्हणजे व्यंगचित्रकार माया कामथ. माया कामथ या भारतातील पहिल्या महिला राजकीय व्यंगचित्रकार होत्या. (Indian female cartoonist)

माया कामथ यांचा जन्म मुंबईतला पण त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले. इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपला चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी मॅकमिलन प्रकाशकांसह चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सोफिया शाळेत चित्रकला शिक्षिकेची नोकरी केली. त्यानंतर लिन जॉन्स्टनच्या फॉर बेटर ऑर फॉर वर्स नावाच्या पुस्तकातील स्केचेस पाहून त्यांना व्यंगचित्रे काढण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर माया कामथ यांनी 1985 मध्ये डेक्कन हेराल्ड समूहाच्या द इव्हनिंग हेराल्ड या प्रकाशनाद्वारे व्यंगचित्रकार म्हणूनकाम करायला सुरुवात केली.नंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, द एशियन एज आणि द टाइम्स ऑफ इंडिया या भारतीय वृत्तपत्रांसाठी काम केले. तसेच थर्ड वर्ल्ड नावाच्या जर्मन संग्रहात देखील त्यांनी पर्यावरणीय व्यंगचित्रांचे योगदान दिले. त्यांच्या या कार्यासाठी ऑक्टोबर 1998 मध्ये, कर्नाटक व्यंगचित्रकार संघटनेने त्यांना व्यंगचित्रकारितेचा पुरस्कार दिला.
माया यांचे वयाच्या ५०व्य वर्षी कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने माया कामथ मेमोरियल अवॉर्ड्स सुरू केले. दरवर्षी, सर्वोत्कृष्ट राजकीय व्यंगचित्रकारांना आणि सर्वात आश्वासक व्यंगचित्रकारांना हा पुरस्कार दिला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version