AsianGames2018 राही सरनौबतची ‘सुवर्ण’मय ऐतिहासिक कामगिरी !

AsianGames2018 राही सरनौबतची  ‘सुवर्ण’मय ऐतिहासिक कामगिरी !

जय महाराष्ट्र वेब टीम, नवी दिल्ली

भारताची महिला नेमबाज राही जीवन सरनौबतने एशिया गेम्स 2018 मध्ये भारताला चौथ गोल्ड मोडल जिंकून दिलं आहे.

राही सरनोबतने 25 मी. पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक भारताच्या नावावर केलं आहे.

हे सुवर्णपदक पटकावत राहीने इतिहास घडवला आहे. सुवर्णपदक मिळवणारी राही सरनौबत ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

या रंगतदार लढतीत राहीने दमदार खेळी करत सुवर्णपदक जिंकले आहे.

भारताच्या मनू भाकरने पात्रता फेरीत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे तिच्याकडून भारताला जास्त अपेक्षा होत्या. मात्र मनू पदक पटकावण्यात अपयशी ठरली.

पण पात्रता फेरीत चांगली खेळी न करता आलेल्या राहीने मात्र अंतिम फेरीत नेत्रदीपक कामगिरी केली.

राहीला सुरुवातीपासूनचं महिलांच्या 25 मी पिस्टल स्पर्धेत थायलंडच्या यांगपाबून हिची स्पर्धा होती.

अखेरच्या काही क्षणांमध्ये यांगपाबून हिने राहीला मागे टाकण्याचा अत्यंत प्रयत्न केला.

पण अखेरच्या क्षणी राहीने आपल्या विक्रमी खेळीने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version