भारतीय रेल्वेचा इतिहास घडवणारी रेल्वे टी-18 चाचणीसाठी रूळांवर धावली. इंजिन नसलेली ही रेल्वे पूर्णपणे युरोपच्या धर्तीवर भारतात निर्माण करण्यात आली आहे.
चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीने याची निर्मिती केली असून 2018 मध्ये पूर्णत्व मिळाल्याने याला टी-18 हे नाव देण्यात आले आहे. रेल्वेप्रवासाच्या दृष्टीकोनातून ही रेल्वे भारतात एक क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे.
या रेल्वेचे वैशिष्ट्ये –
- टी-18 मध्ये कोणतेही इंजिन जोडलेले नसेल.
- ही रेल्वे 160 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावू शकते.
- या रेल्वेच्या डब्यांमध्ये पॉवर कार बसविण्यात आलेली असणार आहे.
- उर्वरित रेल्वेगाडय़ांप्रमाणे याचे डबे बदलले जात नाहीत.
- एका रेल्वेचे सर्व भाग मिळून एका सेटप्रमाणे ती कार्यान्वित होते, याचमुळे याला ‘ट्रेन सेट’ या नावाने देखील ओळखले जाते.
- रेल्वेप्रवासाच्या दृष्टीकोनातून ही रेल्वे भारतात एक क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे.
- या रेल्वेची निर्मिती विशेष ऍल्युमिनियमने करण्यात आल्याने ती वजनाने अत्यंत हलकी असणार आहे.
- तसेच या रेल्वेला ब्रेक लावून रोखणे सोपे असल्याने याला त्वरित वेग देखील दिला जाऊ शकतो.
- या रेल्वेत बसण्याच्या उत्कृष्ट व्यवस्थेपासून एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल.
- तसेच दिव्यांगांसाठी उत्तम व्यवस्था अणि अनेक नव्या सुविधा यात समाविष्ट असणार आहेत.
- टी-18 ही शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार असून प्रवाशांना रेल्वेप्रवासाचा एक नवा अनुभव प्राप्त करून देणार आहे.
- या रेल्वेच्या डब्यांमध्ये पॉवर कार बसविण्यात आलेली असणार आहे.
- 2020 मध्ये टी-20 मधून सामान्य लोकांना प्रवासाची सुविधा प्राप्त होणार आहे.