भारतीय हवामान विभागाची (IMD) अधिकृत वेबसाईट आज अचानक बंद पडल्याने नागरिकांना पावसासंदर्भातील ताजी माहिती मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेबसाईटला भेट दिल्यानंतर ती उघडत नसल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी केली असून, सर्व्हर डाऊन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाची सद्यस्थिती, अलर्ट्स आणि हवामान अंदाज पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर IMD ची वेबसाईट वापरतात. मात्र अचानक सेवा बंद झाल्याने राज्यातील अनेक भागांतील पावसाचे अपडेट्स आणि इशारे मिळणे थांबले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
IMD वेबसाईट पुन्हा कधी सुरू होईल आणि पावसाचे अपडेट्स सामान्यपणे कधी उपलब्ध होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नागरिकांनी अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्स किंवा स्थानिक हवामान अपडेट्सवर अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.