देशात शुक्रवारी ३८ हजार ७९ नवे कोरोनाबाधित

देशात शुक्रवारी ३८ हजार ७९ नवे कोरोनाबाधित

भारतातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येची स्थिती स्थिर आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी ३८ हजार ७९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी ४३ हजार ९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात सध्या ४ लाख २४ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २ लाख २७ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची एकूण संख्या ६१ लाख ९७ हजार १८ इतकी झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version