Abhijeet Dipke Mother Reaction: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; "अखेर मुलाच्या मेहनतीचं फळ मिळालं"

या घडामोडीनंतर आंदोलनाचे प्रमुख चेहरे ठरलेले अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
Abhijeet Dipke Mother Reaction: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; "अखेर मुलाच्या मेहनतीचं फळ मिळालं"

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला. या घडामोडीनंतर आंदोलनाचे प्रमुख चेहरे ठरलेले अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

टीव्ही9शी बोलताना अनिता दीपके म्हणाल्या की, गेल्या अडीच महिन्यांपासून संपूर्ण कुटुंब मोठ्या मानसिक तणावातून जात होते. मुलाच्या आंदोलनामुळे त्याची आणि आमची दोघांचीही झोप उडाली होती. रात्रभर त्याची काळजी वाटायची. अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून त्याच्या सुरक्षिततेची चिंता करत बसायचो. मात्र अखेर त्याने घेतलेल्या कष्टांचे सार्थक झाल्याचे समाधान आज वाटत आहे.

त्यांनी सांगितले की, अभिजीत ६ जून रोजी बोस्टनहून भारतात आला आणि त्यानंतर सातत्याने आंदोलनात सहभागी झाला. या काळात त्याने स्वतःच्या विश्रांतीची पर्वा न करता आंदोलन सुरू ठेवले. अखेर सरकारने निर्णय घेतल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे पाहून आता दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याआधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमारानंतरही अनिता दीपके यांनी मुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, तसेच अभिजीतला अटक होऊ नये, अशी भीती व्यक्त केली होती. आंदोलनाला अनेक दिवस उलटल्यानंतर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागणीची पूर्तता झाल्याचे मानले जात असून, अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version