भारत-चीन संघर्षात वाढ, हिंदी महासागरात चीनी युद्धनौका तैनात

भारत-चीन संघर्षात वाढ, हिंदी महासागरात चीनी युद्धनौका तैनात

वृत्तसंस्था, सिक्कीम

एकीकडे सिक्कीम चीनच्या सीमेवर तणावाचं वातावरण आहे. सिक्कीम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारत प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे आता चीननंही समुद्रात शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे.

 

हिंदी महासागरात चीनी युद्धनौकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. समुद्रातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष ठेऊन आहे. सिक्कीमच्या डोकलाम भागात चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्याने हा सर्व तणाव निर्माण झाला आहे.

 

दरम्यान, मागील दोन महिन्यात हिंदी महासागरात चीनी नौदलाच्या 13 युनिटस आढळल्या आहेत. यात क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विनाशिकांचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version