IndvsWI विंडिजविरुद्ध भारताचा सलग आठवा विजय!

IndvsWI विंडिजविरुद्ध भारताचा सलग आठवा विजय!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधील शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यासह टीम इंडियाने विंडिजविरोधात सलग आठवा विजय मिळवला आहे.

वेस्ट इंडिजचा डाव जेमतेम 104 धावांतच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विंजिडचं हे आव्हान अवघ्या 15 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. रविंद्र जाडेजाची गोलंदाजी आणि पोहिक शर्माची फलंदाजी यांमुळे भारताने अंतिम सामनाही सहज जिंकला आणि सीरिज 3-1 ने खिशात घातली.

अंतिम सामन्यानंतर रविंद्र जाडेजा ‘मॅन-ऑफ-द-मॅच’ ठरला तर हिटमॅन रोहित शर्मा ‘मॅन ऑफ द सीरिज’ बनला.

कशी झाली फायनल?

टॉस जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र सुरूवातीपासूनच विंडिजचा खेळ बिघडत गेला.

2 रन्समध्येच विंडिजचे 2 प्लेयर्स पॅव्हेलियनमध्ये परतले.

ओपनिंग करणाऱ्या रोवमन पॉवेल याने 39 चेंडूंत अवघ्या 16 रन्स केल्या.

तर कॅप्टन जेसन होल्डरनेही 25 रन्स काढल्या.

सॅम्यअल्सने 24 धावा काढल्या.

जाडेजाने 4, बुमराह आणि अहमदने 2-2, कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने 1-1 विकेट काढल्या.

टीम इंडियातर्फे फलंदाजी करताना रोहित शर्माने अर्धशतक ठोकलं. त्याने 56 चेंडूंमध्ये 5 चोकार, 4 षटकार लगावत 62 धावा केल्या.

विराट कोहलीने 29 चेंडूंत 33 धावा केल्या.

शिखर धवनची एकमेव विकेट विंडिजला मिळाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version