कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस अपडेट आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसांमध्ये ९ फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे शासकीय यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

२३ जुलै, २०२४ सांगली : सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस अपडेट आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसांमध्ये ९ फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे शासकीय यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्कालीन विभाग आणि महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन विविध खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. महापुराची परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दिली. सध्या पाण्याची पातळी स्थिर असून, धोक्याची परिस्थिती नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 'महापुराची परिस्थिती उद्भवल्यास महापालिका प्रशासनाकडून तात्पुरता निवारण केंद्रामध्ये नागरिकांना स्थलांतरित केले जाईल'. तसेच, 'कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही, याची पुरेपूर दक्षता महापालिका प्रशासन घेईल', असे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version