दिल्ली, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

दिल्ली, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा देशातील वाढती रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. मागील दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर दिल्लीत दररोज नवीन रुग्णांची संख्या 400च्या पुढे जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्यमंत्रालयाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 3 एप्रिल रोजी मुंबईत 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 एप्रिल रोजी 172 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, दिल्लीत 3 एप्रिल रोजी 293 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 2 एप्रिल रोजी 400हून अधिक रुग्णांची नोंद झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version