छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होणार आहे. केतकी चितळे नेहमीच तीच्या काही न् काही वक्तव्यामुळे चर्चेत येत असते. दरम्यान, पुन्हा केतकी चितळे तीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केतकी चितळे हिने समाज माध्यमांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
ऍड. नितीन भावे यांनी लिहिलेली कविता केतकी चितळेने फेसबुकच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केली आहे. शरद पवारांनी सादर केलेल्या ‘पाथरवट’ या कवितेचा संदर्भ घेत केतकीने पवारांच्या विरोधात कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत.
केतकी चितळे हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी वादात सापडली असून तीच्या विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता आहे. तर यापूर्वीही केतकीने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात सापडली होती. दरम्यान, आता केतकीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीच्यावर कारवाई होते का, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.