मुंबईत पुन्हा आगीचं तांडव, इन्कम टॅक्स इमारतीला आग

मुंबईत पुन्हा आगीचं तांडव,  इन्कम टॅक्स इमारतीला आग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या बॅलार्ड ईस्टेटमधील आयकर ऑफीसला आग लागली आहे. सध्या घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
अद्याप कोणतीही जीवितहानी झालेलं नाही अशी माहीती मिळाली आहे.
मात्र ऑफीसमध्ये उपस्थित पाच ते सहा लोक टेरेसवर अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

LIVEअपडेट –

  • आगीत एकजण जखमी ,6जणांना बाहेर काढण्यात यश
  • दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले
  • 24 अग्निशमन दलाच्या गाड्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
  • अग्निशमन दलाच्या गाड्या वाढवल्या
  • 18 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
  • घटनास्थळी 15 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
  • चर्चगेट येथील इन्कम टॅक्स इमारतीला आग 
  • अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
  • परेशनमध्ये 4 जेट्स
  • ग्राउंड प्लस 6 फ्लोर
  • अाग 3 व 4 व्या मजल्यापर्यंत मर्यादित आहे.
  • वरच्या मजल्यावरील अडकलेल्या 4 ते 5 जणांची सुटका करण्यात आली
  • आगीचे कारण अस्पष्ट 
  • तासाभरापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
  • टेरेसवर अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version