भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. दरम्यान अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या हाती खरातच्या मोबाईलचा सीडीआर लागला आहे. ज्यात खरातला कोणी किती वेळा कॉल केला आणि किती वेळ खरातसोबत संवाद साधला याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा- Ashok Kharat Case: ‘खरातसोबत त्या महिलांनाही दोषी ठरवा’; लेखिकेची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी
अंजनी दमानिया म्हणाल्या की, “कुठलीही लढाई लढायच्या आधी बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते, तसाच काहीसा प्रकार आता झाला आहे. अशोक खरात प्रकरणाबाबत देखील बरीचशी माहिती मला मिळाली आहे, आणि ती मी माध्यमांकडे देतेय. यासंबंधी एक सीडीआर माझ्या हाती लागला आहे. व्हॉट्सॲपद्वारे मला ज्यांनी ही माहिती दिली त्यांना मी ओळखत नाही. मला ही माहिती मिळताच मी ती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तसेच एसआयटी अधिकारीच्या तेजस्वी सातपुतेंना परवाच पाठवली. रुपाली चाकणकर म्हणायच्या अशोक खरात माझे गुरु आहेत आणि त्यांच्याविषयी मला जास्त काही माहित नाही. यावेळी रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल खरातला झाले आहे. त्यात रुपाली चाकणकरांनी खरातसोबत 33 हजार सेकंद अर्थात 550 मिनिटे तर एकूण साडे नऊ तास फोनवरून संवाद साधला आहे”.
“एवढचं नाही तर त्यांची बहीण प्रतिभा ताकड यांचे तर खरातला 236 कॉल आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे 17 कॉल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहे. अनेक माहिती या संस्था पुढे येत असतात, पण सर्वसामान्य जनतेपुढे पण ती माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व काही सांगत आहे. चंद्रकांत पाटील आणि सुनिल तटकरे यांचे 8-8 फोनकॉल आहेत. हे मी नॉर्मल कॉलबद्दल बोलत आहे यात व्हॉट्सॲप कॉलचा काहीही संबंध आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.