मविआत सावळागोंधळ कायम

मविआत सावळागोंधळ कायम

दिनांक – १८ / १ / २०२३, प्रतिनिधीकडून,

अद्यापही विधान परिषद उमेदवारीच्या मुद्द्यावरून मविआ संभ्रमात असून, विधान परिषद निवडणुकीसाठी मविआत धोरण ठरलं नाहीये. बुधवारी याविषयावर बोलावलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादीनं पाठ फिरवली. दरम्यान, सगळेजण गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस नेते सुधीर तांबे यांनी आयत्यावेळी माघार घेतली आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. यावरून एकीकडे सत्यजित तांबे हे मविआचे उमेदवार आहेत का ?, अशी चर्चा रंगली असताना मविआत मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या नाशिक उमेदवारीवरून संभ्रम आहे.

नाशकातील सत्यजित तांबेंना माविआच्या पाठिंब्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना ‘अजूनही पक्षानं कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही’, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. त्यामुळे मविआचे समर्थनाचे धोरण अजूनही ठरलं नसल्याचं चित्र दिसत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मविआत सावळागोंधळ सुरु आहे, त्यामुळेच तर सरकार बदलावं लागलं’, असं म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version