सोलापूर जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात बावची निंबोणी परिसराततील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला होता. अवघ्या चार महिन्यातच सासरच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून बाल नववधूने आत्महत्या केली असून पोलिसांनी पती आणि सासर्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- Pune Crime : हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव, पण प्रियकराच्या मदतीने तिने आपल्याच मुलाला… शिरुरमधली धक्कादायक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील अर्जुन विठोबा ढगे आणि आई शितल अर्जुन ढगे यांनी ती अवघ्या 14 वर्षांची अल्पवयीन असल्याच माहित असून देखील तिचा विवाह ज्ञानेश्वर ज्योतीबा कुटे वयवर्षे 19 या व्यक्तीशी केला. हा विवाह 26 नोव्हेंबर 2025 रोजी लावून देण्यात आला होता. लग्नानंतर नराधम पती ज्ञानेश्वर कुटे याने ती अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, आणि तिला वारंवार मारहाण करून तिचा मानसिक छळ केला.
तसेच, सासरा ज्योतीबा मारुती कुटे आणि सासू संगीता ज्योतीबा कुटे यांनी घरकामाच्या कारणावरून तिला सतत मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून अखेर 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या पीडित मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात पती ज्ञानेश्वर ज्योतीबा कुटे, सासरा ज्योतीबा मारुती कुटे, सासू संगिता ज्योतीबा कुटे, मुलीचे वडील अर्जुन विठोबा ढगे आणि मुलीची आई शितल अर्जुन ढगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.