विधानसभेत फडणवीसांची मविआवर टीका, म्हणाले…

विधानसभेत फडणवीसांची मविआवर टीका, म्हणाले…

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आज छोटं का होईना पण मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळाले. त्यांच्या भाषणात ते विसरले असतील की, ५० हजार हेक्टर शेतकऱ्यांना द्यायचे होते. मात्र, आम्हाला मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळण्याचा आनंद आहे.

विंदा करंदीकरांच्या कवितेतून राज्यसरकारवर टीका

गेल्या दोन वर्षापासून राज्यात सरकारकने काहीही केले नाही. राज्यात नवीन योजना, नवीन प्रकल्प आणले नाहीत, तर सुरू असलेले प्रकल्प बंद पाडले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी मविआ सरकारवर केली आहे. तसेच, ‘माकडछाप तंदमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ या कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतून राज्य सरकारवर टीका केली आहे.

‘महाविकास आघाडी म्हणजे मद्यविक्री आघाडी’

राज्य सरकारने किराणा दुकानांत वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भडका उडाला. या मुद्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. आता सरकारी कार्यक्रमात वाईन देणार का? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारला टोला लगावला आहे. आम्हाला वाटायचे की, ही महाविकास आघाडी आहे. नंतर कळले की, महाविनाश आघाडी आहे, त्यानंतर कळाले की, महावसुली आघाडी आहे आणि आत कळतेय की ही मद्यविक्री आघाडी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महापालिकेत मविआचे घोटाळे

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पालिकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजत असून, मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचे काम सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली  आहे. तसेच पालिकेत आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, असा टोलाही फडणवीसांनी मविआवर लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version