राष्ट्रवादीला धक्का, 11 नगरसेवकांचा ‘भाजपा’मध्ये प्रवेश…

राष्ट्रवादीला धक्का, 11 नगरसेवकांचा ‘भाजपा’मध्ये प्रवेश…

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सांगली महापालिकेतील 11 आजी – माजी नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. 

सांगलीत होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा पक्ष प्रवेश पार पडणार होता, मात्र कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने ही बैठक रद्द झाली आणि रावसाहेब दानवे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. या 11 नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version