नाशिकमध्ये बापाने केली चिमुरड्याची निघृणपणे हत्या

नाशिकमध्ये बापाने केली चिमुरड्याची निघृणपणे हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नाशिकच्या जैतुननगर परिसरात एका सावत्र बापानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलीसांनी आईला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे तसंच फरार झालेल्या बापाला शोधण्यासाठी पोलीसांनी पथक रवाना केलं आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जैतुननगर परिसरात एका सावत्र बापानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घुणपद्धतीनं हत्या केली आहे. नकुल थोरात असं या चिमुरड्याचं नाव आहे. गेल्या काही वर्षांपासुन नकुल व त्याची आई जैतुननगर परिसरातील एका घरात राहत होते. मात्र त्याचा सावत्र बाप दर दोन दिवसांनी घरात येवुन नकुल आणि त्याच्या बहिणीला बेदम मारहाण करत असे.

या मारहाणीमुळेच या परिवाराला अनेक भागांतुन हाकलवून देण्यात आलं होतं. दोन दिवसांपासुन 40 वर्षीय साहिल चतुर्वेदी या नकुलच्या सावत्र बापानं त्याला इतकं मारलं की तो बेशुद्ध पडला होता. हातात येइल त्या काठीनं, दांडक्यानं एवढंच नाही तर नकुलच्या डोक्यात त्याच्या बापानं विट देखील घातल्याचं पोलीसांच्या प्राथमिक तपासात निश्पन्न झालं आहे.

हा सावत्र बाप नकुलच्या लहान बहिणीला देखिल मारहाण करायचा. नकुलसोबत त्यानं तिला देखिल मारहाण केली होती. मात्र फक्त दैव बलवत्तर म्हणुन ती वाचली पण नकुल मात्र वाचु शकला नाही. जखमी बहिणीला नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version