हरयाणात फिरतोय ‘सायको किलर’;सीसीटीव्हीत झाला कैद

हरयाणात फिरतोय ‘सायको किलर’;सीसीटीव्हीत झाला कैद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

हरयाणाच्या पलवल भागात सायको किलरची दहशत पसरली आहे. परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी काल रात्री अवघ्या दोन तासांमध्ये सहा जणांच्या एकाच पद्धतीने हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.

धक्कादायक म्हणजे या सर्व हत्या शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर परिसरात झाल्या आहेत. एकाच व्यक्तीने या हत्या केल्या आहेत. मारेकऱ्याने लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून त्यांचे खून केलेत.

हा सायको किलरएका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्याआधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही चित्रणात मारेकऱ्याच्या हातात लोखंडी रॉड दिसतोय. या हत्याकांडानंतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version