Hidden Camera Shoot : फिजिओथेरपिस्टच्या चेंजिंग-रूममधील व्हिडिओ चित्रित; टेक्निशिअनकडून ब्लॅकमेल-मारहाण करत अत्याचार, गुन्हा दाखल

Hidden Camera Shoot : फिजिओथेरपिस्टच्या चेंजिंग-रूममधील व्हिडिओ चित्रित; टेक्निशिअनकडून ब्लॅकमेल-मारहाण करत अत्याचार, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये क्लिनिकमध्ये कपडे बदलताना गुपचूप अश्लील व्हिडिओ काढून 25 वर्षीय आरोपी सरफराज गोनगावे याने फिजिओथेरपिस्ट तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावी उत्तीर्ण टेक्निशियन तरुणाने ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या कुटुंबानेही तिला ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुख्य संशयितांवर सरफराज मेहबुब गोनगावे याच्यासह त्याचा भाऊ अरबाज गोनगावे आणि वडील मेहबुब गोनगावे (सर्व, रा. आझाद चौक) यांच्यावर क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : Nashik Accident: देवळा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात; समोरून आलेल्या इर्टिगाने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

पीडित एका नामांकित शिक्षण संस्थेत फिजिओथेरपिस्ट असून शहरातील एका हेअर ट्रान्सप्लांट सेंटर' मध्ये ट्रॅकोलॉजिस्ट म्हणून सराव करत होती. 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास क्लिनिकमध्ये ती कपडे बदलत असताना तिच्यासोबत शालेय वर्गापासून शिकणारा सरफराज मेहबुब गोनगावे याने गुपचूप मोबाईलमध्ये तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ दाखवून आरोपीने तिच्याकडे संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यावर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात आरोपीने तरुणीवर क्लिनिकच्या ऑपरेशन थिएटरमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे पुन्हा मोबाईलमध्ये चित्रण केले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुख्य संशयितांवर सरफराज मेहबुब गोनगावे याच्यासह त्याचा भाऊ अरबाज गोनगावे व वडिल मेहबुब गोनगावे (सर्व, रा. आझाद चौक) यांच्यावर क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version