बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजार येथील लिलावात लिंबास प्रतिकिलो ९२ रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. तसेच किमान प्रतिकिलो दर ६५ रुपये व सरासरी प्रतिकिलो दर ८० रुपये निघाले. तर जळोची उपबाजार येथील भाजी मार्केटमध्ये बुधवारी (दि. २८) कांद्यास प्रतिक्विंटल कमाल ४६०० रुपये व सरासरी दर ३४५० रुपये असे दर निघाले. लिंबास मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.