मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या…

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या…

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता अनेक मराठा बांधव आत्महत्या करत आहेत याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाने आपले जीवन संपवले आहे. औरंगाबदमधील प्रमोद होरे पाटील असं मृत तरूणाचे नाव असून या तरूणाने रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवले आहे.

या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असं कॅप्शन टाकून त्याने रेल्वे रुळाजवळ उभा असतानाचा फोटो फेसबुकवर एक पोस्ट केला होता. तसेच प्रमोदने काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्याने लिहले होते ‘चला आज एक मराठा जातोय, पण मराठा आरक्षणासाठी काही तरी करा’. त्यानंतर त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याची फेसबुक पोस्ट पाहिली आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचे समोर आले.

प्रमोद विवाहित होते आणि त्यांच्या पश्चात 2 मुलेही आहेत. प्रमोद रविवारी दुपारपासून बेपत्ता होते याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

  • प्रमोद होरे पाटील असं मृत तरूणाचे नाव
  • आत्महत्या करण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असं कॅप्शन टाकून रेल्वे रुळाजवळ उभा असतानाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला
  • काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्याने लिहले होते ‘चला आज एक मराठा जातोय, पण मराठा आरक्षणासाठी काही तरी करा’.
  • मित्र-मैत्रिणींनी  पोस्ट पाहिली आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचे समोर आले

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही – मुख्यमंत्री

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा – गडकरी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version