आता 24 तासांत होणार 969 विमानांची वर्दळ

आता 24 तासांत होणार 969 विमानांची वर्दळ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीत एक नवा उच्चांक गाठण्यात आला आहे. 24 तासांत 969 विमानांची वर्दळ हाताळण्यात आली आहे. हवाई नियंत्रण कक्षातील नियंत्रकांचे काटेकोर नियोजन आणि विमानतळाच्या सर्व यंत्रणांचा समन्वय यामुळे हे शक्य झाले आहे, असे हवाई नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सन 2006 पर्यंत मुंबई विमानतळावर तासाला 30 विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग व्हायचं. मुख्य धावपट्टी वेगानं मोकळी करण्यासाठी बांधलेले टॅक्सीवे, नवी रडार आणि इतर सुलक्ष प्रक्रियांमुळे 2 वर्षांत ही संख्या तासाला कमाल 52 विमानांची हाताळणी करण्यापर्यंत पोहोचली. यापूर्वी 24 तासांत कमाल 852 विमानांची हाताळणी झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version